बातम्या

सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण...

Free higher education for girls from ordinary families


By nisha patil - 1/7/2024 10:00:54 PM
Share This News:



राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतलेल्या राज्यातील सर्व मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून मोफत उच्च शिक्षण या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला.जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांनी शैक्षणिक क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दादांचे मनस्वी अभिनंदन केले.
 

या शैक्षणिक निर्णयासाठी शासनाच्यावतीने २००० कोटी रुपयांची तरतूद केली असून सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे मत याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केले. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पेढे वितरित करून आनंद व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी राहूल चिकोडे, सरचिटणीस गायत्री राऊत, सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, विजयसिंह खाडे-पाटील, मंगला निपाणीकर, अभिजित शिंदे, रुपाराणी निकम, गिरीष साळुंखे, रविकिरण गवळी आदी उपस्थित होते.


सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण...