विशेष बातम्या

महाशिवरात्री निमित्त ‘गोकुळ’ तर्फे मोफत दूध वाटप

Free milk distribution by Gokul on the occasion of Mahashivratri


By nisha patil - 2/26/2025 8:39:03 PM
Share This News:



महाशिवरात्री निमित्त ‘गोकुळ’ तर्फे मोफत दूध वाटप

कोल्हापूर, ता. २६: महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) तर्फे भाविकांसाठी मोफत दुधाचे वाटप करण्यात आले. मध्यवर्ती बस स्थानकातील श्री वटेश्वर मंदिरात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली.

महादेव मंदिरांमध्ये दुग्धाभिषेकासाठी गोकुळने मोफत दूध उपलब्ध करून दिले, तसेच गोकुळ बासुंदी सवलतीच्या दरात विक्रीस ठेवण्यात आली. चंदगड, कणेरी मठ, वडणगे, उत्तरेश्वर पेठ आदी ठिकाणीही हा उपक्रम राबवण्यात आला.

यंदा महाशिवरात्रीस दूध विक्रीत १.०४ लाख लिटर वाढ होऊन एकूण विक्री १७.५४ लाख लिटर झाली. या उपक्रमास गोकुळ संचालक व अधिकारी उपस्थित होते.मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथील श्री वटेश्वर मंदिर येथे मध्ये भाविकांना दुग्धाभिषेक करण्यासाठी  दूध वाटप करताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, संभाजी पाटील , सहा.महाव्यवस्थापक (मार्केटिंग) जगदीश पाटील, मार्केटिंग प्रमुख हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे तसेच व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदि दिसत आहेत .


महाशिवरात्री निमित्त ‘गोकुळ’ तर्फे मोफत दूध वाटप
Total Views: 35