बातम्या
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मरळी येथे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर
By nisha patil - 1/30/2025 10:45:34 PM
Share This News:
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मरळी येथे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर
महिलांनी संघटित होऊन व्यवसाय करावा – अरुंधती महाडिक यांचे मार्गदर्शन
पन्हाळा तालुक्यातील मरळी येथे भारतीय जनता पार्टी आणि धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने महिलांना खाद्यपदार्थ व गृहउपयोगी साहित्य निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमात सौ. अरुंधती महाडिक यांनी महिलांशी संवाद साधत त्यांना विविध उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारावा, तसेच कृषीपूरक व्यवसायासाठी ड्रोन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या वेळी मा. अश्विनी वास्कर, सरपंच कमल चौगुले, उपसरपंच वसंत पवार यांच्यासह अनेक मान्यवर व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मरळी येथे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर
|