बातम्या

भारताचा स्वातंत्र्यलढा

Freedom Struggle of India


By nisha patil - 8/12/2023 3:46:19 PM
Share This News:



भारताचा स्वातंत्र्यलढा

पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला' व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले. त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला. इ.स. १८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व भारतात प्रस्थापित केले होते. त्या जोरावर १८ व्या शतकातही ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले.

ईस्ट इंडिया कंपनीचा ध्वज
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

१८५७चा उठाव ब्रिटिशांच्या व्यापारामुळे आणि वसाहतवादी धोरणामुळे त्यांची भारतावर स्थापन झालेली सत्ता मोडून काढण्यासाठी इ.स. १८५७ साली भारतीयांनी उठाव केला.इंग्रजानी भारतीय नागरिकांवर लादलेल्या प्रक्षोभक कायद्यामुळे भारतातील प्रजेचा असंतोष वाढत होता. रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी काही विशेष नावे या उठावाशी संबंधित आहेत. हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी यांच्या झुंजार पराक्रमाने भारतीय इतिहासात मोलाची भर घातलेली आहे. या लढ्याच्या अपयशाची परिणती म्हणून ब्रिटिश राणीचा अंमल भारतावर सुरू झाला.

बंगालची फाळणी आणि वंगभंग चळवळ
इ.स. १९०५ साली लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. पूर्व बंगाल आणि आसाम हे प्रांत एकत्र केले आणि दुसरीकडे पश्चिम बंगालची स्वतंत्र रचना केली. त्याच्या या कृत्यामुळे भारतीय नागरिक संतप्त झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला होता. या फाळणीच्या विरोधात भारतीयांनी १९०८ साली वंगभंग चळवळ सुरू केली.

अनुशीलन समितीचे चिहन
देशभक्तांची चळवळ

लाल-बाल-पाल
चळवळीच्या प्रेरणा देणारे नेतृत्व-
देशातील युवकांना विशेषतः देशभक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक व्यक्तीनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आणि आपल्या कार्यातून देशातील नागरिकांना आवाहन केले. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, लाला लजपतराय, सय्यद अहमद खान, बंकिमचंद्र चॅटर्जी, दादाभाई नौरोजी यासारख्या अनेक व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. लाल-बाल-पाल ही त्रयी म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल यांनी या सर्व क्रांतीकार्याची धुरा पेलली.लोकमान्य टिळक यांना मंडाले येथे झालेली राजद्रोहाच्या आरोपासाठी जन्मठेप,स्वातंत्र्यवीर सावरकर यांना झालेली अंदमानच्या काळ्या समुद्रावरील जन्मठेप या ऐतिहासिक घटना स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेनुसार अवनींद्रनाथ ठाकूर यांनी क्रांतीकार्याला प्रेरक असे भारतमातेचे चित्र तयार केले. हे चित्र सर्वत्र प्रसारित करण्यात आले.

मिठाचा सत्याग्रह- ब्रिटिश सत्तेचा भारतावरील अंमल मोडून काढण्यासाठी भारतात पद्धतशीरपणे आणि नियोजनपूर्वक चळवळ आखली गेली. यांच्या धुरीणांनी समाजाला आवाहन केले आणि भारताचे नागरिक स्वतःच्या प्रेरणेने या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले हे याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाने केला गेलेला दांडी येथील मिठाचा सत्याग्रह हा याचेच एक उदाहरण होय. गांधीजी हे लंडन येथून ब्यारीस्टर शिक्षण संपादन करून परत भारतात आले. त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाला अनुसरून त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना संघटित केले. मिठाचा सत्याग्रह किंवा ब्रिटिश राजवटीशी असहकार चळवळ या चळवळी त्यांच्या नेतृत्वाने झाल्या. स्वातंत्र्य प्राप्त करण्यात अशा चळवळींना थेट यश आले नसले तरी त्यामुळे देशातील नागरिकांत स्वातंत्र्याची जाणीव वाढविण्यात अशा चळवळींचे योगदान महत्त्वाचे ठरले.

स्वदेशी चळवळ- परदेशी मालावर भारतीयांनी बंदी घातली आणि स्वदेशी मालाचा पुरस्कार करण्याचे भारतीय नागरिकांना आवाहन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केल्याची घटना इतिहासात महत्त्वाची मानली जाते. लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचे व्रत घेण्याचे लोकांना आवाहन केले. भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याद्वारे ब्रिटिशांच्या जुलूमाला विरोध करण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करून भारतीयांनी आपला असंतोष व्यक्त केला. या चळवळीने संपूर्ण भारतातील क्रांतीकार्याला जोर चढला. स्वराज्य, स्वभाषा, स्वदेशी या सूत्रांनी भारतीय नागरिकांत प्रेरणा जागी ठेवण्याचे कार्य या चळवळींनी केले.
 

असहकार चळवळ- ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या सरकारी संस्था, न्यायालये यावर बहिष्कार घालणे,कर न भरणे,शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार घालणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून भारतीयांनी ब्रिटीश सत्तेविरुद्ध आपला विरोध दर्शविला


Freedom Struggle of India