बातम्या
डी.वाय.पाटील अभियांत्रिकीकडून ‘राखी विथ खाकी’ उपक्रम साजरा
By nisha patil - 2/9/2023 7:32:13 PM
Share This News:
कोल्हापूर/ कोणताही सण असला तरी पोलिसांना शांतता व कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी कामावर हजर राहावेच लागते. त्यामुळे डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनींनी यंदाचे रक्षाबंधन पोलिस दादांसोबत रक्षाबंधन साजरे केले.
शहरातील जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील जाऊन विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बाधल्या. केवळ बहिणींचे नव्हे तर सर्व समाजाचे रक्षण करण्यास नेहमीच तत्पर असलेल्या पोलीसामुळेच आम्ही सुरक्षित आहोत अशा भावना व्यक्त विद्यार्थिनीनी यावेळी व्यक्त केल्या. पोलीसदादांच्या दीर्घायुष्याबद्दल यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनींनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल पोलिसानी अतिशय आनंद व्यक्त केला. अनेकदा कामामुळे आम्हाला आमच्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे करता येत नाही. मात्र, आज विद्यार्थिनीनी आमच्या भगिनी बनून रक्षाबंधन साजरे केल्याने आनंद झाल्याची भावना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रियांका घोडके, क्रांती जगताप, पौर्णिमा दुर्गुळे, हर्षदा गवंडी, पल्लवी पाटील, प्राजक्ता देसाई, सृष्टी पाटील या विद्यार्थिनींसह एन एस एस प्रोग्राम ऑफिसर योगेश चौगुले, डॉ.राजेंद्र रायकर उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
डी.वाय.पाटील अभियांत्रिकीकडून ‘राखी विथ खाकी’ उपक्रम साजरा
|