बातम्या
1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम बदलणार राष्ट्रीय पेन्शन खातेधारकांसाठी
By nisha patil - 1/30/2024 5:22:23 PM
Share This News:
एनपीएस (NPS) धारकांसाठी म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन सिस्टम योजनेअंतर्गत खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. 1 फेब्रुवारीपासून एनपीएस संदर्भातील महत्त्वाच्या नियमामध्ये बदल होणार आहे. पुढील महिन्यापासून एनपीएसमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल होणार आहे. पीएफआरडीए म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1 फेब्रुवारीपासून NPS खातेधारकांसाठी खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. आता खातेदारांना पुढील महिन्यापासून जमा केलेल्या रकमेपैकी फक्त 25 टक्के रक्कम काढता येणार आहे.
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने 12 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, NPS खातेधारक मुलांचे शिक्षण, लग्नाचा खर्च, घर खरेदी, वैद्यकीय खर्च इत्यादींसाठी त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी केवळ 25 टक्के रक्कम काढू शकतील. हा नवीन नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. याशिवाय तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी NPS खात्यातून पैसे काढता येतील.
1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम बदलणार राष्ट्रीय पेन्शन खातेधारकांसाठी
|