बातम्या
10 जानेवारी पासून काळम्मावाडी धरणाचे पाणी संपूर्ण कोल्हापूर शहरात
By nisha patil - 12/30/2023 1:58:07 PM
Share This News:
10 जानेवारी पासून काळम्मावाडी धरणाचे पाणी संपूर्ण कोल्हापूर शहरात
पालकमंत्री हसन मुश्रीफ राजश्री छत्रपती शाहू स्मारकाचा प्रश्न सोडवणार
कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेतील प्रत्येकी 940 हॉर्स पॉवर चे दोन पंप सुरू झाले आहेत तिसरा पंप 10 जानेवारी पासून सुरु होईल. तिन्ही पंपाद्वारे 180 एम एल डी पाण्याचा उपसा करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण कोल्हापूर शहराला कळमवाडी धरणातून स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही पालकमंत्री या समस्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांचा महापालिका अधिकाऱ्यांसोबत सर्किट हाऊस येथे आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी प्रशासक के .मंजू लक्ष्मी अतिरिक्त आयुक्त, रविकांत अडसुळे, केशव जाधव, प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, शहरातील शाहू मिलच्या 27 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजश्री छत्रपती शाहू स्मारक उभारण्यात येणार आहे मात्र ही जागा वस्त्र उद्योग महामंडळाकडे असल्याने स्मारक रखडले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वस्त्र उद्योग महामंडळ आहे. त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न तडीस नेणार आहे.
अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिन्या व पाण्याच्या टाक्यांची कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील. कोल्हापूर शहरात दररोज 176 एमएलडी सांडपाणी तयार होत आहे. महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आली आहेत. आणखी 40 एम एल डी केंद्राची आवश्यकता आहे त्यानंतर पंचगंगा प्रदूषण मुक्त होईल असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेतून कोल्हापूरला सोळा कोटींचा निधी मिळणार आहे त्यातून स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवणे ,कचरा संकलनासाठी 30 टप्पर खरेदी करणे, ओपन स्पेस विकसित करणे ,आधी कामे केली जाणार आहेत, दाभोळकर करणारे ते हवा स्वच्छ करणारी यंत्रणा प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आली आहे. दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येत आहेत .असे मुश्रीफ यांनी सांगितले
10 जानेवारी पासून काळम्मावाडी धरणाचे पाणी संपूर्ण कोल्हापूर शहरात
|