बातम्या
डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मंदीतही आयटी नोकऱ्यांची संधी
By nisha patil - 3/25/2024 7:36:29 PM
Share This News:
कोल्हापूर आयटी असोसिएशनच्या सहकार्याने डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेगा प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे २५० हून अधिक विद्यार्थ्यांना आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. आयटी कंपन्यांमध्ये सध्या मंदीचे वातावरण सुरू असतानाही या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हसाठी कोल्हापुरातील १९आयटी कंपन्यानीउपस्थित राहून विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या आहेत.
आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या सहकार्याने डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी मेगा कॅम्पस प्लेसमेन्ट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून ४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोल्हापूर मधील १९ कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सोळाशे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या. यामधील अडीचशे विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये वालस्टार टेक्नॉलॉजी लिमिटेड, ईश्वर्या बीआयटेक, रिअल तैम अप्लिकेशन सोल्युशन,कॅचे टेक्नॉलॉजी, लीफटेक, स्माईल ऑटोमेशान, काम्पोटेक, ऍक्टिव्ह सॉफ्टवेअर, सुकृत इन्फोटेक, व्हीस्काय, आर एन सॉफ्टवेअर, बियानी टेक्नॉलॉजी, , विन सॉफ्ट, ट्रॅव्हल प्लेजर, मॉडर्न कॉम्प्युटर, क्रिएशन मल्टीमीडिया आदी कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
आयटी कंपनीमध्ये सध्या मंदीचे वातावरण असून अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला जात आहे. असे असताना डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयटी असोसिएशन कोल्हापूरच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग तील विद्यार्थ्यांना आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन केले होते
यावेळी आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष प्रसन्न कुलकर्णी, सचिव रणजीत नार्वेकर, खजिनदार राहुल मेंच आणि इतर पदाधिकारी, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्टर डॉ. लीतेश मालदे, कॅम्पस टी.पी.ओ. सुदर्शन सुतार, टी.पी.ओ. मकरंद काईगडे यांच्यासह संतोष कोरे, नितीश शिंदे, सुरज पाटील, धनश्री पाटील, स्नेहल केरकर, विद्यार्थी समन्वयक आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मंदीतही आयटी नोकऱ्यांची संधी
|