बातम्या

१६ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने गगनबावडा गडावर फुगडी सोहळा..

Fugdi ceremony at Gaganbawda Fort on the occasion of 16th death anniversary celebrations


By nisha patil - 1/23/2024 1:37:22 PM
Share This News:



१६ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने गगनबावडा गडावर फुगडी सोहळा..

  गगनबावडा : प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
 

गगनबावडा येथील गगनगिरी येथे श्री गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट गगनबावडा, कोल्हापूर १६वी पुण्यतिथी सोहळा भव्य फुगडी स्पर्धा हिंदू संस्कृती पूर्ण जगात जोपासली जाते. याचाच एक भाग म्हणून
माय माऊलींना पवित्र तीर्थक्षेत्र स्वामी गगनगिरी महाराज आश्रम मध्ये संधी देण्याचा हा उद्देश असून येथे मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून हिंदू परंपरा जोपासावी ही विनंती. हिंदू संस्कृत पारंपारिक बुधवारी दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी वेळ- सकाळी १०.ते दुपारी ३.०० पर्यंत स्पर्धा घेण्यात येणार असून यासाठी
प्रवेश - फ्री आहे. तर बक्षिस प्रथम पारितोषक -३००१ व्दितीय पारितोषक - २००१ तृतिय पारितोषक -१००१ नियमावली-प्रत्येक स्पर्धक एकाच ग्रुपमध्ये सहभाग घेवू शकतो.प्रत्येक ग्रुपला वेळ मर्यादा फक्त १२ मि. देण्यात येईल असे संयोजक यांनी तारा न्युज शी बोलताना सांगितले.

●●● स्थळ●●●
श्री. प.पु. स्वामी गगनगिरी महाराज आश्रम गगनगड, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर
अधिक माहितीसाठी संपर्क - ९४२०५८५०४०/९८२२६७४४२८


१६ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने गगनबावडा गडावर फुगडी सोहळा..