बातम्या
माझ्या लेकाची मागणी लवकर पूर्ण करा हाकेंच्या आई वडिलांनी केली मागणी
By nisha patil - 6/20/2024 8:18:59 PM
Share This News:
सांगोला तालुक्यात हाके यांच्या जुजारपुर येथील घरी चार आज दिवसापासून चूल पेटली नाही. लक्ष्मण हाके यांच्या वृद्ध आई वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. हाके यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने आईला येऊ नकोस असा निरोप मुलगा लक्ष्मण हाके यांनी दिल्याचे सांगताना तिला अश्रू अनावर होत आहेत . तो अस्वस्थ असून त्याच्या पोटात अन्नाचा कण नसताना आम्हाला कसे अन्न गोड लागेल असा सवाल या वृद्ध माऊलीने केला .
सरकारने दखल घेऊन त्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी ही आमची मागणी आहे. माझ्या लेकाची अवस्था बघून मला थंडी- ताप भरला आहे. सरकार का दखल घेत नाही, हेच आम्हाला कळत नाही. . त्यांच्या तब्येतीसाठी आमचा जीव खालीवर होत आहे. त्यामुळे माझ्या लेकाची मागणी लवकर पूर्ण करा, अशी मागणी हाकेंच्या आई वडिलांनी केली आहे.
माझ्या लेकाची मागणी लवकर पूर्ण करा हाकेंच्या आई वडिलांनी केली मागणी
|