बातम्या

सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी निवडलेला फंडा आला अंगलट

Funda Ala Anglat has been chosen to create a buzz on social media


By nisha patil - 9/5/2024 7:25:12 PM
Share This News:



सोशल मीडियावर रिल्स बनवून झटपट प्रसिद्ध होण्यासाठी आणि केवळ मौज-मस्तीसाठी 4 अल्पवयीन मुलांनी वेगळाच फंडा अवलंबलाय. पण हा फंडा आता त्यांच्या चांगलाच अंगलट आलाय. महार्गावर व्हिडिओ शूट करत 120 पेक्षा जास्त वेगानं वाहन चालवत असताना त्याचं हे बिंग फुटलं. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी नवनवीन वाहनचोरी करून मजा करण्याऱ्या एका तरुणासह 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय.  मिर्झा उबेद बेदमिर्जा सईद बेग असं कार चोरणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत तब्बल 70 लाखांहुन अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.अकोल्यातल्या काही शाळकरी मित्रांनी एक धाडसी पाऊल उचलले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वसामान्यांसह पोलिसांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय. सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासोबतच फक्त मौज-मजेसाठी 4 अल्पवयीन मुलांसह एका तरुणाने चोरीचा  मार्ग निवडलाय. या पाच जणांनी थेट अकोल्यातल्या एमआयडीसी भागातील महिंद्रा शोरुमवरच डल्ला मारलाय. तर पुढं स्टॉक यार्डमधून चौघांनी महागड्या 3 लक्झरीएस कार चोरल्या. ज्याची किंमत प्रत्येकी 26 लाखापेक्षा अधिक आहे. मात्र हे प्रकरण पोलिसांनी  उघडकीस आणताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.


सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी निवडलेला फंडा आला अंगलट