विशेष बातम्या

शेलारवाडी येथे साकव बांधणीसाठी ५२ लाखांचा निधी मंजूर

Funds of Rs 52 lakhs approved for construction of a dam at Shelarwadi


By nisha patil - 3/17/2025 4:56:35 PM
Share This News:



शेलारवाडी येथे साकव बांधणीसाठी ५२ लाखांचा निधी मंजूर

आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

शेलारवाडी (ता. पन्हाळा): कोलोली पैकी शेलारवाडी येथील कराळे टेक रस्त्यावर नाळव्याच्या ओढ्यावर साकव बांधण्यासाठी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या फंडातून ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांचे भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे आणि ग्रामस्थांच्या शुभहस्ते पार पडले.

या साकव बांधणीमुळे स्थानिक नागरिकांना प्रवासासाठी मोठी सुविधा मिळणार असून, पावसाळ्यात होणारा त्रास कमी होईल.

यावेळी उपस्थित मान्यवर:
विकास पाटील, कोलोली गावच्या सरपंच पवित्रा कांबळे, उपसरपंच प्रकाश पाटील, प्रा. बी. के. जाधव, माजी सरपंच सर्जेराव जाधव, राजाराम परीट, दत्त आसुर्लेचे माजी संचालक आर. पी. पाटील, नारायण शेलार गुरुजी, चेअरमन सरदार पाटील, शिवाजी पाटील, पी. डी. हाकारे, सागर जाधव, तानाजी ढवळे, अंकुश पाटील यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि जनसुराज्य शक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या साकवामुळे गावातील रहिवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.


शेलारवाडी येथे साकव बांधणीसाठी ५२ लाखांचा निधी मंजूर
Total Views: 31