बातम्या

. ....फक्त एक संधी द्या पारदर्शी कारभार, आरोग्य व शैक्षणिक सुविधा काय असतात हे दाखवून देतो ; समरजितसिंह घाटगे

GIVE JUST ONE CHANCE shows what transparent governance


By nisha patil - 10/28/2024 10:18:01 PM
Share This News:



. ....फक्त एक संधी द्या पारदर्शी कारभार, आरोग्य व शैक्षणिक सुविधा काय असतात हे दाखवून देतो  ; समरजितसिंह घाटगे 

कौलगे,ता.२८:  फक्त पाच वर्षासाठी आमदारकीची एक संधी द्या पारदर्शी कारभार, आरोग्य व शैक्षणिक सुविधा काय असतात हे दाखवून देतो. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.कौलगे (ता.कागल) येथे आयोजित केलेल्या परिवर्तन जाहीर सभेत ते बोलत होत‌.सभेच्या अध्यक्षस्थानी दशरथ पाटील होते.
   

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,"सामान्य माणूस त्यांच्याकडे काम घेऊन गेल्यास पालकमंत्री त्यांच्या  लाडक्या कॉन्टॅक्टरला, विचारल्याशिवाय काम करत नाहीत. पालकमंत्र्यांनी लाडक्या कॉन्ट्रॅक्टरांचा विकास केला. त्यामुळे शाश्वत विकास काय असतो हे कागल गडहिंग्लज उत्तुरच्या जनतेला दिसलेलाच नाही. पालकमंत्री पंचवीस वर्षे विकास केला म्हणतात तर मग तुम्हाला बोगस मतदान, अशोभनीय, खालच्या दर्जाची वक्तव्य  का करावी वाटतात? आदर्श लोकसेवक कसा असावा. पायाभूत विकास काय असतो हे कागल गडहिंग्लज उत्तुर मतदारसंघातील जनतेला दाखवून देतो." 
       

 स्वागत व प्रास्ताविक विनोद भोसले यांनी केले. यावेळी रवींद्र पाटील, शिवानंद माळी, शिवाजी कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस दत्तामामा खराडे, वाय.जी. पाटील, यशराजे घाटगे, सुधाकर सुळकुडे, प्रभाकर कांबळे, आनंदा पाटील, कपिल यादव,अजित कांबळे, शशिकांत पाटील, अजिंक्य भोसले, पांडुरंग सुतार, कमलाकर पाटील, विनोद भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.
--
कोट्यवधी रुपयांचा निधी घशात घालणारा पालकमंत्री.. 

येथील युवकांना रोजगार मिळावा म्हणून दिल्लीचे तख्त हलवणारे लोकनेते स्व  सदाशिवराव मंडलिक कुठे? शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी रस्त्यावर लढणारे सहकारातील आदर्श नेते स्व. विक्रमसिंहजी घाटगे कुठे? तर हजारो कोटींचा निधी चार कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालणारा सौदागर पालकमंत्री  कुठे? अशा सौदागर पालकमंत्र्याला या निवडणुकीतून हद्दपार करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर असल्याचे प्रतिपादन राज कांबळे यांनी केले.
----
 चौकट- पालकमंत्री यांच्या बेबंदशाही व हुकूमशाहीच्या विरोधात एकसंध होऊया.. .

   कागल तालुक्यात पालक पालक मंत्री यांच्याकडून हुकुमशाही, बेबंदशाही सुरू आहे.  लोकशाही काढून घेण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर सुरु आहे. यामधून लोकशाही धोक्यात येत असून मतदानाचा अधिकार विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कागल तालुक्यात चाललेल्या या  हुकूमशाहीच्या, बेबंद शाहीच्या विरोधात आपल्याला एकसंध होऊन  लढा देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी केले.


. ....फक्त एक संधी द्या पारदर्शी कारभार, आरोग्य व शैक्षणिक सुविधा काय असतात हे दाखवून देतो ; समरजितसिंह घाटगे