बातम्या
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे आयोजित जीपीकॉन २३-२४ परिषद संपन्न
By nisha patil - 1/23/2024 1:45:22 PM
Share This News:
कोल्हापूर:पांडुरंग फिरींगे वैद्यकिय क्षेत्र वाढत चालले आहे यात नवनवीन तंत्र ज्ञान उपयुक्त ठरणार असून विन्स हॉस्पिटल आता तशाच पद्धतीने मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल झाले असून याचा उपयोग निश्चित रुग्णाला होणार आहे.अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर डॉक्टरांनी करावा असे प्रतिपादन डॉ संतोष प्रभू यांनी केले.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची १२ वी जीपीकॉन २४ परिषद आज संपन्न झाली.या परिषदेचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.विन्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. संतोष प्रभू यांच्या हस्ते व ज्येष्ठ होमियो पँथीतज्ञ डॉ.मोहन गुने व आयुर्वेदिकतज्ञ प्राचार्य डॉ.अशोक वाली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.यावेळी डॉ.हरिश नांगरे पाटील,डॉ वर्षा पाटील,डॉ राजेश सोनवणे,डॉ राजेश सातपुते,डॉ सुजाता प्रभू,डॉ किरण दोशी,डॉ आकाश प्रभू,डॉ प्रशांत कुटाळे,डॉक्टर दिपक पोवार , डॉ.महादेव जोगदंडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ होमियो पँथी तज्ञ डॉ.मोहन गुने यांनी जीपीए च्या सर्व काम करणाऱ्या डॉकटर यांना शुभेच्छा दिल्या.तर डॉ.अशोक वाली यांनी बोलताना वेगवेगळ्या पॅथी च्या डॉक्टरांनी एकमेकांच्या सहायाने चांगले काम करावे तरच वैद्यकीय क्षेत्र उन्नत होईल असे सांगितले. डॉ.किरण दोशी यांनी बोलताना जनरल प्रॅक्टिशनर्स यांच्याकडूनच मोलाचे योगदान वैद्कीय क्षेत्राला मिळत असल्याचे सांगितले.
या परिषदेत डॉ.दिलीप शिंदे आणि डॉ.पी.पी. शहा यांना जी पी ए जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ.अल्पना चौगुले, डॉ.सोपान चौगुले यांचा शिवराज्याभिषेक सोहळा चित्र काढल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनला सहकारणारे सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राम मंदिर उद्घाटनाचे औचित्य साधून गुरुकुल गार्डन प्ले स्कूल साने गुरुजी च्या बालचमुने राम ,सीता ,लक्ष्मण व हनुमान या वेशभूषेत येऊन उपस्थित डॉक्टरांची मने जिंकली.
यावेळी सचिव डॉक्टर हरीश नांगरे यांनी जीपीए कार्याचा आढावा घेतला तर जीपिकॉन बद्दल डॉ. राजेश सातपुते यांनी विचार मांडून प्रास्ताविक केले. जिपीकॉन चेअरमन डॉ. राजेश सोनवणे यांनी स्वागत केले व जीपीकऑन सचिव डॉ दीपक पोवार यांनी मासिकाबद्दल विचार मांडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका "मिरर"चे प्रकाशन करण्यात आले.
जनरल प्रॅक्टिशनर्सना वैद्यकीय क्षेत्रात ज्यावेळी आपत्कालीन स्थिती निर्माण होते अशावेळी विविध विषयाशी निगडित आपत्कालीन स्थिती कशी सांभाळायची याचे आधुनिक ज्ञान या परिषदेत विविध व्याख्यात्यांच्या मार्फत दिले गेले. या परिषदेचे मुख्य प्रायोजक विंन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होते.या परिषदेत सुरुवातीला मेंदू भूलशास्त्र तज्ञ डॉ. सुजाता प्रभू या मेंदुतील इजा व फॅक्चर्स याबद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान याची ओळख करून दिली. त्यांच्याकडे आधुनिक टेक्नॉलॉजी भारतातील पहिली आहे.याविषयी माहिती दिली.विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळया निदान व उपचार पद्धती याबद्दल सांगून चक्कर आल्यानंतर काय करावे याविषयी माहिती सांगितली.
जनरल प्रॅक्टिशनरच्या दृष्टिकोनातून सामान्य हृदयविकाराच्या इमर्जन्सी कशा हाताळायच्या याबद्दल प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. आलोक शिंदे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना त्यांनी छातीत दुखल्यास काय करावे,ह्दय विकाराचे निदान कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ मंजुळा पिशवीकर यांच्या वतीने डॉ.अस्मिता गीलांकर भागवत यांनी स्त्री व प्रसुती शास्त्रातील इमर्जन्सी याविषयी बोलताना त्यांनी गरोदर पणात यावयाची काळजी व गुंतागुतीच्या गरोदर पणाचीही माहिती दिली.
त्वचा विकारासंबंधीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. निहारिका प्रभू नायक यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान व त्वचाविकार याबद्दल मार्गदर्शन केले. तर डॉ. देयोना प्रभू यांनी प्लास्टिक सर्जरी तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले तर डॉ. आकाश प्रभू यांनी पॉलीट्रामा मॅनेजमेंट याबद्दल माहिती दिली याविषयी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील निष्णात डॉक्टर एकत्र आल्यामुळे पॉलीट्रोमा यावर चांगले उपचार करता येतात व रुग्ण मृत्यूचे प्रमाण कमी होते.असे सांगितले. कोल्हापूर शहरामध्ये नव्याने अत्याधुनिक विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार होत असून त्याबद्दलची माहिती डॉ. व्यंकट होलसंबरे यांनी दिली. त्याचबरोबर पॅनल डिस्कशन व प्रश्नोत्तरांचे कार्यक्रमही झाले. औषधी कंपन्या व विविध विषयाशी निगडित अशा स्टॉलचे प्रदर्शनही याठिकाणी ठेवण्यात आले होते.यावेळी सूत्रसंचालन डॉ.सुनीता देसाई यांनी केले व आभार डॉ.प्रशांत खुटाळे यांनी मानले. या परिषदेला कोल्हापूर व परिसरातून 400 डॉक्टर्स उपस्थित होते.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे आयोजित जीपीकॉन २३-२४ परिषद संपन्न
|