बातम्या

मराठा समजाकडून गडहिंग्लज बंदला आ. सतेज पाटलांचा पाठिंबा

Gadhinglaj was closed by the Maratha community


By nisha patil - 4/9/2023 5:41:31 PM
Share This News:



गडहिंग्लज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकल मराठा समाज बांधव एकत्र आले होते. या आंदोलनात आ. सतेज पाटील यांनी सहभाग घेवून राज्य सरकारचा निषेध करून  आम सतेज पाटील यांनी जनसंवाद यात्रेची शहरातील पदयात्रा रद्द करून सकल मराठा समाजाला पाठींबा दिला . जनसंवाद यात्रेच्या निमिताने आ. सतेज पाटील हे गडहिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. आमदार सतेज पाटील यांनी  मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत  गडहिंग्लज बंदला जाहीर पाठिंबा दिला.यावेळी अमर चव्हाण किरण कदम बंटी कोरी शिवाजीराव खोत अँड दिग्विजय कुराडे,विद्याधर गुरबे, बसवराज आजारी अंजना रेडेकर यांच्यासह गडहिंग्लज परिसरातील विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.


मराठा समजाकडून गडहिंग्लज बंदला आ. सतेज पाटलांचा पाठिंबा