बातम्या

गहुंजेमधील हत्या प्रकरणाला वेगळं वळण; पत्नीचा बनाव उघड,

Gahunje murder case takes a different turn Uncover wifes fakeness


By nisha patil - 5/6/2023 6:34:44 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  पुण्याच्या  मावळमधील जावयाच्या हत्याप्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. पत्नीनेच पतीच्या हत्येचा  बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पती शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. शनिवारी रात्रीही सूरज काळभोरने पत्नी अंकिता काळभोरचा शारीरिक छळ केला. मग ती चांगलीच संतापली, या त्रासाला कंटाळून तिने पतीला संपवायचं ठरवलं. यासाठी अंकिताने रविवारी  सकाळी पतीला माहेरी म्हणजे गहूंजेला न्यायचं ठरवलं. तत्पूर्वी घरातील चाकू तिने सोबत घेतला होता. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील सूरजच्या घरातून ते सकाळी निघाले. तिथून दोघांनी प्रति शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. मग दुपारी गहूंजेतील  घरी जायच्या आधी तिथल्याचं शेतात पोहोचले. तिथे पोहोचल्यावर अंकिताने लघुशंकेला जायचा बहाणा केला. थोडं नजरेआड जाऊन तिने पतीवर नजर ठेवली. पती बेसावध असल्याची खात्री केली अन् सोबत आणलेला चाकू बाहेर काढला. दबक्या पावलाने पती जवळ जाऊन तिने मागून चाकूने गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. यात पतीचा मृत्यू झाला, अशी माहिती अंकिताकडे केलेल्या चौकशीत समोर आलेली आहे. 
याआधी चार ते पाच अज्ञातांनी पती सूरजची हत्या केल्याचा बनाव अंकिताने रचला होता. मात्र तिने सांगितलेल्या घटनाक्रमावर पोलिसांना संशय आला आणि उलट तपासणी करतच पत्नीचे बिंग फुटले. तळेगाव पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. 
पुण्याच्या मावळ तालुक्यात गहुंजे गावात रविवारी सकाळी एकाची हत्या झाली होती. सूरज काळभोर असं मृताचं नाव असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. सायंकाळी साडे चारच्या सुमारास हत्या झाल्याचं उघड झालं होतं. चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी शस्त्राने वार करुन सूरजची हत्या केल्याचं म्हटलं जात होतं. दोघे शेतात होते. पत्नी लघुशंकेसाठी जाऊन येते असं म्हणाली, त्याचवेळी हल्लेखोर सूरजची हत्या करुन पसार झाले, असं अंकिताने पोलिसांना सांगितलं होतं. परंतु ही हत्या अंकितानेच केल्याचं आता पोलीस तपासात समोर आलं. दरम्यान एप्रिल महिन्यातच सूरज आणि अंकिताचं लग्न झालं होतं. त्यानंतर तो काल  पत्नीसह सासुरवाडीत गेला होता. त्यावेळी ही घटना घडली.


गहुंजेमधील हत्या प्रकरणाला वेगळं वळण; पत्नीचा बनाव उघड,