बातम्या

वजन वाढतंय आणि रात्री करताय अशा चुका

Gaining weight and making mistakes at night


By nisha patil - 1/30/2024 7:36:01 AM
Share This News:



धावपळीचं आयुष्य, जेवणाची न ठरलेली वेळ… इत्यादी गोष्टींमुळे वजन वाढतं. शिवाय धकाधकीच्या जीवनामुळे डायबिटीज आणि बीपी यांसारखे आजार देखील डोकं वर काढतात. अनेक असे आजार आहेत, ज्यांमुळे वजन तर वाढतंच, पण अनेक आजार देखील होण्याची शक्यता असते.

त्यामुळे जेवताना आणि जेऊन झाल्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. रात्री जेऊन झाल्यानंतर काही अशा गोष्टी आहे, ज्या करणं टळायला हवं…

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी अत्यंय महत्त्वाचा भाग आहे. पण रात्री जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास हानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. रात्री जेवण झाल्यानंतर जवळपास 45 ते 60 मिनिटांनंतर पाणी प्यावं आणि जेवण करण्याआधी अर्धा तास आधी पाणी प्यावं. एक्सपर्टनुसार, जेवण झाल्यानंतर अन्न पचायला 2 तास तरी लागतात. म्हणून जेवणाआधी अर्धातास जेवल्यानंतर 45 ते 60 मिनिटांनंतर पाणी प्यावं…

जेवण झाल्यानंतर तुम्हाला देखील लगेच झोपायची सवय असेल तर, आजच ही सवय सोडा. कारण जेवण झाल्यानंतर लगेच झोपल्यास जळजळ, गॅस, ब्लोटिंग यांसरख्या समस्या उद्ध्वतात. जेवण झाल्यानंतर 3 ते 4 तासांनंतर तुम्ही झोपू शकता. त्यामुळे वेळ ठरवून रात्रीचं जेवण आणि झोपायची वेळी ठरुन घ्या.

काही लोकांना जेवल्यानंतर कॉफी नाही तर, चहा पिण्याची सवय असते. म्हणून ही सवय स्वतःला लावून घेवू नका. काही लोक सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी चहा आणि कॉफीचं सेवन करतात. ज्यामुळे पचन क्रिया मंदावते. एवढंच नाही तर, गॅस आणि ऍसिडीटीची समस्या डोकं वर काढते. एवढंच नाही तर, वजन वाढण्यास सुरुवात होते.

रात्री उशीरा जेवण करत असाल तर, आजच दिवसभराची वेळ ठरवा. दिवसभराचं काम पूर्ण करण्यासाठी फार वेळ लागतो किंवा कामाची वेळ देखील तशी असल्यास जेवण्यास विलंब होतो. पण रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन आधी जेवण केल्यास पचन क्रिया योग्य प्रकारे होतं. रात्री 7 ते 8 वाजता जेवायला हवं आणि 10 ते 11 पर्यंत झोपलं तरी आरोग्य ठिक राहतं.


वजन वाढतंय आणि रात्री करताय अशा चुका