बातम्या

गांधिनगर हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण...

Gandhinagar High School debuts in golden jubilee year


By nisha patil - 8/2/2025 8:05:31 PM
Share This News:



गांधिनगर हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण...

गांधीनगरातील एज्युकेशन सोसायटी संचलित गांधिनगर हायस्कूलने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने सोसायटीच्या वतीने गेल्या पन्नास वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व आ.अमल महाडिक उपस्थित होते.

फाळणीच्या कटू आठवणी दूर सारत सिंधी समाज आज पुन्हा नवी भरारी घेत आहे. आपल्या संस्कार आणि देशभक्तीने नवे आदर्श निर्माण करत आहे याचे सारे श्रेय सिंधू एज्युकेशन सोसायटी सारख्या शिक्षण संस्थांना आहे असे विचार आ.अमल महाडिकांनी याप्रसंगी मांडले.


गांधिनगर हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण...
Total Views: 85