बातम्या
गांधीनगर बाजारपेठेला केंद्र शासनाने आधार देण्याची गरज
By nisha patil - 1/16/2024 11:19:25 PM
Share This News:
गांधीनगर : बाजारपेठेत येणाऱ्या व सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पंधरा हजारावर आहे. मिरज, हातकणंगले, निमशिरगांव, माणगांव, जयसिंगपूर, परिसरातील कर्मचारी बाजारपेठेत सेवा बजावतात. त्यांना एसटीतून प्रवास करणे आर्थिकदृष्टया परवडत नाही. जर मिरजहून येणाऱ्या सर्व एक्सप्रेस गांधीनगर रेल्वे स्टेशनवर थांबल्या तर या कर्मचाऱ्यांना अल्पदरात गांधीनगर बाजारपेठेत येता येईल. याशिवाय मिरज जंक्शन वरुन परराज्यातून येणारा व्यापारी वर्ग व ग्राहकांची सोय होईल. गेल्या कित्येक महिन्यापासून एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नसल्याने गांधीनगर बाजारपेठेमध्ये मंदीचे सावट दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील या अग्रगण्य बाजारपेठेला आधार देण्याची केंद्रसरकारची जबाबदारी
आहे. केंद्रीय रेल्वे खात्याने गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडया थांबविल्यातर गांधीनगर बाजारपेठेला पुन्हा उर्जीत अवस्था येईल. याबाबतचे निवेदन रेल्वे प्रबंधक छत्रपति शाहू महाराज टर्मीनल, कोल्हापूर यांना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज देण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांधीनगर बाजारपेठेला केंद्र शासनाने आधार देण्याची गरज
|