राजकीय

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

Gandhinagar residents strongly support Rituraj Patil


By nisha patil - 11/18/2024 11:01:15 PM
Share This News:



गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ
 

कोल्हापूर, : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून गांधीनगरवासियांनी आमदार ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ देण्याचा निर्धार केला.
     

आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगर मुख्यमार्गावरील गणेश टॉकीज येथून पदयात्रेला सुरुवात केली. श्री चौक, युवा एकता ग्रुप, बी ग्रुप, सर्वधर्मीय तरुण मंडळ, जी पी ग्रुप, खाऊ गल्ली, कोयना कॉलनी, पर्सनल पॉवर ग्रुप, छत्रपती शिवाजी चौक, हनुमान मंदिर या मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली. नागरीकांनी ठिकठिकाणी आ.पाटील यांचे उत्साही स्वागत केले. 
  

 सरपंच संदीप पाटोळे म्हणाले, गांधीनगर बाजारपेठ व परिसराच्या विकासासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्ता रुंदीकरणाचे काम केल्याने वाहतुकीची कोंडीचा प्रश्न मिटला आहे. गांधीनगरच्या विकासासाठी सतत प्रयत्नशिल असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत.  
 

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगर व्यापारवाढीसाठी प्रयत्नशिल आहे. भविष्यात गांधीनगरला अधिक समृध्द व विकसीत करण्यासाठी माझे योगदान असेल.
 

उपसरपंच विनोद हुजराणी, सदस्य निवास तामगावे, रियाज सनदी, सनी चंदवानी, अर्जुन मिसाळ, गजेंद्र हेगडे, वैशाली चोबे, जाहिदा इनामदार, प्रीत हुजराणी, विजया उदासी, दिपाली जाधव, अमृता सावंत, सोनी सेवलानी, प्रताप चंदवानी, आनंदा घोळे, नितेश चोबे, सचिन जोशी, महेश पोपटानी, विशाल पहुजा, राजेंद्र कांबळे, रेश्मा दर्डा, आनंद कांबळे, सद्दाम सोलापूरे, सुनील आवळे, तानाजी पोवार, विठ्ठल देवकुळे, लखन पवार, पार्श्व वळवडे, पप्पू पाटील, सुहास यादव, ओमकार जोशी, शैलेश शिंदे, सुनील हेगडे, राजू चंदनशिवे, आनंद साळुंखे, अथर्व संकपाळ, प्रभाकर कांबळे यांच्या नागरीक उपस्थित होते.


गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ