बातम्या

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांची गंगोत्री समाजापर्यंत पोहचविणार : श्री.राजेश क्षीरसागर

Gangotri society Mr Rajesh Kshirsagar


By nisha patil - 8/26/2023 5:02:04 PM
Share This News:



कोल्हापूर दि.२६ : मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम हिंदू, मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य असणारे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी देशप्रेम, प्रखर हिंदुत्ववादी विचार, महिला सबलीकरणासह, शिक्षणापासून नोकरीपर्यंत भूमिपुत्रांना न्याय अशी भूमिका घेवून शिवसेनेसाठी आपल अखंड आयुष्य वेचले. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची गंगोत्री समाजापर्यंत पोहचविणार, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्या वतीने शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित समस्त शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी विनम्र अभिवादन केले. यानंतर  "धर्मवीर आनंद दिघे" यांचा जयघोष करण्यात आला.
 

यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रभावित होवून धर्मवीर आनंद दिघे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना तळागाळात पोहचवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं. त्यासाठी रात्रीचा दिवस केला. पायाला भिंगरी लावून त्यांनी शिवसेना वाढवली. शहरी भाग, आदिवासी वस्त्या, पाडे या ठिकाणी शिवसेना पोहचवली. त्यांनी सुरु केलेला दहीहंडी हा सार्वजनिक उत्सव आज महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. आपल्या कृतीतून गोरगरीब सर्वसामन्य जनतेला न्याय देण्याच काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केले असून, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अपेक्षित हिंदुत्व आणि समाजहिताचे काम मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करणार असल्याचेही श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

            यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, जेष्ठ हिंदुत्ववादी उदय घोरपडे, उपशहरप्रमुख सम्राट यादव, संतोष घाटगे, गणेश रांगणेकर, उदय पाटील, सुभाष भोसले, रोहन शिंदे, कृपालसिंह राजपुरोहित आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.      
 


गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांची गंगोत्री समाजापर्यंत पोहचविणार : श्री.राजेश क्षीरसागर