बातम्या

कोल्हापुरात सुरु होणार कचरा उठाव

Garbage picketing to begin in Kolhapur


By nisha patil - 6/28/2023 1:06:07 PM
Share This News:



कलेक्टर रेखावारांच्या मध्यस्थीनंतर टिप्परचालकांचा संप स्थगित 

तारा न्यूज वेब टीम :  टिप्परचालकांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु होता. सकाळी अकराच्या सुमारास टिप्परचालक "मी टिप्परचालक, सांगा 8000 पगारात माझं घर कसं चालवू? किमान वेतनासाठी पाठिंबा द्या" अशा आशयाचे फलक धरून शहरातील चौका-चौकात उभे राहत नागरिकांना भावनिक आवाहन केले. 

या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आप चे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांच्याशी  फोन वरून संपर्क साधत किमान वेतन देणारे टेंडर प्रसिद्ध करण्याबाबत सकारात्मक असून दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावू, तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घ्यावी अशी विनंती केली. 

यावर सर्व टिप्परचालकांची सायंकाळी सहा वाजता बैठक होऊन जिल्हाधिकाऱ्यांची विनंती लक्षात घेत काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय मागे  घेतला असल्याचे आप कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितल
महापालिका कर्मचारी उपलब्ध करून दिल्यास साठलेला कचरा उठाव करण्यासाठी व नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी जादा वेळ काम करण्याचे जाहीर केले. यावेळी उत्तम पाटील, सुरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, संजय राऊत, युवराज कवाळे, कुमार साठे, बाजीराव गवळी, सागर व्हल्लार, जयसिंग चौघुले आदी उपस्थित होते


कोल्हापुरात सुरु होणार कचरा उठाव