बातम्या
गौरी गणपतीतही मिळणार आनंदाचा शिधा
By nisha patil - 8/18/2023 6:24:54 PM
Share This News:
दिवाळीप्रमाणेच गौरी गणपतीत देखील राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.त्यामुळे दिवाळीप्रमाणेच राज्यातील गोर गरीब जनतेचा गणेशोत्सव आनंदात साजरा होणाराय. गौरी गणपती आगमनसाठी आता काही दिवस उरले आहेत. गौरी -गणपतीला नैवेद्याचे पदार्थ बनवण्याचे वेध लागलेल्या गृहिणी स्वस्त धान्य दुकानांमधे 100 रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार आहे.लाभार्थी, दुकानदारांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर दुकानांमध्ये शिधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे.
गौरी गणपतीतही मिळणार आनंदाचा शिधा
|