बातम्या
गौतम बुध्द यांच्या २५६८ वी जयंती शास्त्रीनगर येथील बुध्द गार्डन येथे साजरी करण्यात आली
By nisha patil - 5/24/2024 11:42:40 PM
Share This News:
कोल्हापूर/प्रतिनिधी : तथागत गौतम बुध्द यांचा धम्म व फुले, शाहू, आंबेडकर यांचे मानवतावादी विचार समाजामध्ये पोहचविण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर समाजबांधवानी एकत्रितपणे जयंती उत्सव साजरे केले पाहिजेत. आज प्रत्येक गाव गड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात जयंती उत्सव साजरे होत आहेत. आज बहुजन समाजाला बुध्द धम्म आणि बाबासाहेब यांचा विचार पटत आहे. त्यामुळे आपण सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीमध्ये मध्यवर्ती जयंती समितीच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्याची अवश्यकता आहे असे मत मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांनी व्यक्त केले.
बुध्द गार्डन संवर्धन विकास संघाच्या वतीने तथागत गौतम बुध्द यांच्या २५६८ वी जयंती शास्त्रीनगर येथील बुध्द गार्डन येथे साजरी करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रेमानंद मौर्य बोलत होते.
यावेळी बोलतांना मौर्य म्हणाले, संपूर्ण जगामध्ये बौध्द बांधव सक्रीय झाले आहेत. बुध्दांच्या व बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. पुढच्या काळामध्ये बुध्दांचा विचार समाजामध्ये पोहचविण्यासाठी वाचन संस्कृती वृध्दीगंत केली पाहिजे.
यावेळी डॉ. धुमाळे, डी.जी. भास्कर, देवदास बानकर, संजय गुदगे, उषा गंवडी, अनिता गवळी मॅडम आदिंनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस डॉ. अरुण धुमाळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन करण्यात आले त्यानंतर सामुदायिक बुध्द वंदना व त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले. दीपप्रज्वलन प्रेमानंद मौर्य यांच्या हस्ते तसेच प्रतिमेस डी. जी. भास्कर यांच्या हस्ते पुष्प आर्पण करण्यात आले.
यावेळी बुध्द गार्डन संवर्धन विकास संघाचे अध्यक्ष सुखदेव बुध्याळकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
यावेळी रघुनाथ मांडरे, दयानंद शेडगे, रमेश कांबळे, विलास भास्कर, अजय डोंगरे, सौरभ बुध्याळकर, पंकज आठवले, प्रविण बनसोडे, सुरेश नागटिळे, संतोष हिरवे, संजय कांबळे, वैभव प्रधान, नामदेव कोथळीकर, सुकुमार कोठावळे, नामदेव माने, के. टी. सडोलीकर, अनिता समुद्रे, शोभा बुध्याळकर, ज्योती बुध्याळकर, उज्वला चंदनशिवे, पूनम बानकर, ज्योती आठवले, कविता महाजन नागटिळे, ज्योति डोंगरे, मीना कांबळे, वैशाली लिंगनूरकर आदिसह उपासक उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
गौतम बुध्द यांच्या २५६८ वी जयंती शास्त्रीनगर येथील बुध्द गार्डन येथे साजरी करण्यात आली
|