बातम्या

गौतम गंभीरने घेतला हा तडकाफडकी मोठा निर्णय...!

Gautam Gambhir took this hasty big decision


By nisha patil - 2/3/2024 7:45:34 PM
Share This News:



गौतम गंभीरने घेतला हा तडकाफडकी मोठा निर्णय...!


नवी दिल्ली : भाजप नेता आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने  लोकसभा निवडणूक  न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. गौतमने म्हटले आहे की, मी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याचे आवाहन करतो, जेणेकरून मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकेन. गौतम गंभीर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजप खासदार होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून पहिल्यांदाच संसदेत पोहोचला होता. 
   

गौतमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर लिहिले की, मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद.' आता पूर्व दिल्लीतून भाजप कोणत्या उमेदवाराला तिकीट देते हे पाहावे लागेल. गौतम गंभीरने निवडणूक न लढवण्याचा निर्णय अशावेळी घेतला आहे, जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत ज्या जागांवर पक्ष आधीच विजयी झाला आहे, त्या जागा आणि उमेदवारांची नावे असतील, अशी जोरदार चर्चा आहे.यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांसारख्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश असू शकतो. भाजपच्या पहिल्या यादीत ज्या जागांची घोषणा होऊ शकते त्यात वाराणसी, गांधीनगर, अमेठी, नागपूर, लखनौचा समावेश असू शकतो.


गौतम गंभीरने घेतला हा तडकाफडकी मोठा निर्णय...!