विशेष बातम्या

आडनावावरुन सुरु असणाऱ्या वादावर गौतमी पाटीलच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया

Gautami Patils father reacted to the dispute over the surname


By nisha patil - 2/6/2023 4:00:51 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम गौतमी पाटील  ही गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौतमीच्या नृत्यशैलीवर काही जण आक्षेप घेतात तर काही जण गौतमीच्या आडनावावरुन तिच्यावर टीका करतात. गौतमीच्या आडनावावरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. गौतमीमुळे पाटील या आडनावाची बदनामी होते, त्यामुळे तिने पाटील आडनाव वापरू नये अशी मागणी एका संघटनेकडून करण्यात आली होती यावर आता गौतमीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
एका मुलाखतीमध्ये गौतमी पाटीलचे  वडील रवींद्र नेरपगारे पाटील यांनी गौतमीच्या नावाबाबत सांगितले. गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांनी गौतमीच्या नावाबाबत म्हणाले, 'गौतमीचं शाळेतील दाखल्यावरील नाव गौतमी पाटील आहे आणि जन्म नाव वैष्णवी आहे. मी 20 वर्षांपासून गौतमी आणि तिच्या आईपासून वेगळं राहात आहे. '
काही लोकांचे मत आहे की गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये, याबाबत गौतमीच्या वडिलांना प्रश्न विचारण्यात आला. यावर रवींद्र यांनी उत्तर दिल, 'जर तिचं आडनाव पाटील आहे तर ती पाटील आडनाव हे लावणारच.' 
गौतमीच्या वडिलांनी पुढे सांगितलं,  'मला अनेकवेळा गौतमीची आठवण येते. पण तिच्याबरोबर कधी संपर्क झाला नाही.' गौतमी पाटील करत असलेल्या नृत्याबाबत  आनंद वाटतो. मात्र काही जण तिच्यावर ज्या टीका करतात, त्याच वाईट देखील वाटतं, असंही गौतमी पाटीलचे वडील रवींद्र नेरपगारे पाटील यांनी  सांगितलं. गौतमीचे वडील हे गेल्या वीस वर्ष पासून ते शेती करत आहेत.


आडनावावरुन सुरु असणाऱ्या वादावर गौतमी पाटीलच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया