बातम्या
मोती नगर येथील गावठी हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त
By nisha patil - 1/30/2025 11:55:00 AM
Share This News:
मोती नगर येथील गावठी हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त
राजारामपुरी पोलिसांना मोतीनगर येथे गावठी दारूची निर्मिती मोठया प्रमाणात चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी पथकासह बुधवारी सकाळी मोतीनगरातील गावठी अड्डे उध्वस्त केले.
यावेळी १ लाख १० हजार रुपयांचे रसायन नष्ट केले.या प्रकरणी जेवर कदम बागडी, संतोष किरण बाटुंगे व काजल अनिल मच्छले या मोतीनगर, कंजारभाट वसाहतमध्ये राहणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल केलेत.
ही कारवाई उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे, सहायक फौजदार रशिद शेख, अरविंद पाटील, सचिन देसाई, महेश कुंभार, प्रविण आवडे, अनिल चव्हाण, महिला हेड कॉन्स्टेबल मिनाक्षी पाटील,सुप्रिया कचरे, नितीन मेश्राम, नितीश बागडी, नितीन कुऱ्हाडे, विकास चव्हाण, श्रृती कांबळे आदींनी केलीय.
मोती नगर येथील गावठी हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त
|