बातम्या
केजरीवालांच्या अटकेवर थेट जर्मनीने केलं भाष्य
By nisha patil - 3/23/2024 4:55:59 PM
Share This News:
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केल्यानंतर राजधानी राजकीय वातावरण तापलं आहे. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अटकेवर भाष्य केलं आहे. यामुळे भारत सरकारने नाराजी जाहीर करत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष घालू नये असं सांगत केंद्र सरकारने शनिवारी जर्मन दुतावासाचे उप-प्रमुख जॉर्ज एनजवीलर यांना समन्स पाठवलं. यानंतर जॉर्ज एनजवीलर यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मिळालेला माहितीनुसार , परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल जर्मनचे राजदूत जॉर्ज एनजवीलर यांच्याकडे निषेध नोंदवला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याप्रकरणी निवेदन प्रसिद्ध केलं आहे. "आपल्या अंतर्गत बाबींवर परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या टिप्पण्यांबद्दल भारताचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी आज नवी दिल्लीतील जर्मन मिशनच्या उपप्रमुखांना बोलावून जाणीव करुन दिली. आम्ही अशा टिप्पण्यांना आमच्या न्यायिक प्रक्रियेत आणि न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यातील हस्तक्षेप मानतो. ज्याप्रकारे भारत आणि इतर लोकशाही देशांमध्ये कायदा आपलं काम करतो, त्याचप्रमाणे येथेही कायदा आपलं काम करेल. याप्रकरणी एका बाजूने आपली मतं बनवणं योग्य नाही," असं ते म्हणाले आहेत.
केजरीवालांच्या अटकेवर थेट जर्मनीने केलं भाष्य th
|