बातम्या

मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय

Get children used to outdoor games from childhood


By nisha patil - 12/3/2024 7:20:20 AM
Share This News:



व्यायाम करण्यासाठी जिममध्येच गेले पाहिजे, हा गैरसमज आहे. कुठलाही मैदानी खेळ किंवा जॉगिंग, रनिंग यामुळेही शरीराचा चांगला व्यायाम होतो. लहानपणी असा व्यायाम केल्यास आयुष्याच्या उत्तरार्धातही तो फायदेशीर ठरतो. लहानपणी व्यायाम केलेला असल्यास शरीराला, हाडांना सवय झालेली असते. ती बळकट होतात. यासाठी पालकांनी मुलांसोबत व्यायामाला, खेळायला, फिरायला गेले पाहिजे.

हे आहेत फायदे

१) नंतरच्या आयुष्यात व्यायाम सोडला, जीवनशैली बिघडली, तरी त्याचा जास्त निगेटिव्ह परिणाम शरीरावर होत नाही.

२) हाडे मोडण्याचे प्रमाण कमी होते.

३) चयापचय क्रिया तुलनेने चांगली राहते.

४) लठ्ठपणाचे प्रमाण कमी राहाते.


मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय