बातम्या
3 मिनिटात दूर करा डोकेदुखी ! वापरा ‘ही’ जपानी ‘थेरपी’, जाणून घ्या
By nisha patil - 1/3/2024 7:41:09 AM
Share This News:
डोकेदुखी ही सामान्य समस्या आहे. यावर काहीजण पेनकिला गोळ्या घेतात, परंतु, हे आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकते. शिवाय डोकेदुखीचा परिणाम तुमच्या कामावरही होतो. जपानमध्ये डोकेदुखीवर शियात्सु थेरपीचा वापर केला जातो. यात मालिश केले जाते. यात बोटांच्या माध्यमातून काही विशेष पॉईंट दाबून उपचार केले जातात.
अशी आहे थेरपी
थेरपी 1
डोके जोरात दुखत असेल तर बोटांनी कपाळावर सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. यामुळे नसांमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो. नसांमधील तणाव कमी होतो. डोकेदुखी दूर होते.
थेरपी 2
हात चांगले स्वच्छ धुवा. बोटांच्या मदतीने आय-ब्रोच्या मधल्या जागेला दाबत मसाज करा. या जागेतून शरीराच्या वायटल एनर्जीचा प्रवाह होतो. जवळपास एक मिनिट या पॉईंटवर दाबून ठेवल्यास ते अॅक्टीवेट होतात आणि डोकेदुखी कमी होते.थेरपी 3
प्रथम डोळे बंद करा. आयब्रोपासून अर्ध्या इंचावर असलेल्या जागेवर दोन्हीकडून सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. यामुळे डोक्यात रक्तप्रवाह वेगाने होतो. डोकेदुखी दूर होते.
3 मिनिटात दूर करा डोकेदुखी ! वापरा ‘ही’ जपानी ‘थेरपी’, जाणून घ्या
|