बातम्या

मानेचे दुखणे पळवा ६० सेकंदांत, लगेच मिळेल आराम

Get rid of neck pain in 60 seconds


By nisha patil - 2/3/2024 7:32:10 AM
Share This News:



एकाच स्थितीत आठ-आठ तास बसून काम केल्यामुळे काहींना मान, पाठ, कंबरेचे दुखणे सुरू होते. यासाठी बैठे काम करणारांनी दर अर्धा तासाने उठून थोडे चालले पाहिजे. जेणेकरून शरीराला थोडा व्यायाम मिळेल आणि शिरा मोकळ्या होतील. परंतु, ही काळजी न घेतल्याने अनेजण मानदुखीच्या आजाराने त्रस्त असतात. दीर्घ काळापर्यंत खुर्चीवर बसून काम केल्यास मान आणि पाठीच्या वरच्या भागात वेदना होतात. स्नायूंमधील तणाव आणि वेदनेपासून आपण फक्त ६० सेकंदांतच मुक्ती मिळवू शकतो, असे काही तज्ज्ञ सांगतात.

दुखण्याची जागा ओळखा
मानेच्या उजव्या भागात दुखत असेल तर डावा हात वेदनेच्या जागी ठेवा आणि मानेच्या डावीकडे दुखत असल्यास उजवा हात वेदना होत असलेल्या बिंदूवर ठेवा.

बिंदूवर दाब द्या 
दुखत असलेल्या ठिकाणी बोटांनी हळूहळू दाबा. दाब दिल्याने जास्त वेदना होणार नाहीत, याची काळजी घ्या.


मानेची हालचाल
वेदना होत असलेल्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेने मान झुकवा. स्नायू सक्रिय करण्यासाठी दाब दिल्याने तुम्हाला आराम मिळेल.

ताण द्या
आपण आळस देतो त्याप्रमाणे मान आणि पाठीचा वरचा भाग ताणून धरा. यामुळे वेदना कमी होतील. यामुळे स्नायूंना आराम मिळेल.


मानेचे दुखणे पळवा ६० सेकंदांत, लगेच मिळेल आराम