बातम्या

आरोग्याबाबतचे ‘हे’ ७ गैरसमज आज करा दूर, जाणून घ्या सत्य

Get rid of these 7 misconceptions about health today


By nisha patil - 3/19/2024 7:26:11 AM
Share This News:



आरोग्य चांगले रहावे म्हणून प्रत्येकजण विविध पद्धतीने आपआपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. परंतु, ही काळजी बहुतांश ऐकुव माहितीवर घेतली जाते. अथवा घरात पूर्वीपासून मोठ्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे काळजी घेतली जाते. मात्र, कधी-कधी वर्षानुर्ष चुकीच्या माहितीच्या आधारे अथवा गैरसमजातून आरोग्याची काळजी घेतली जाते आणि अशा अनेक गोष्टी आपण उगाचच फॉलो करत असतो. असेच काही गैरसमज आणि सत्य माहिती आपण जाणून घेणार आहोत.

१) जवळून टीव्ही पाहील्याने डोळे खराब होतात
– जवळ जाऊन मोबाईल अथवा टीव्ही पाहिल्याने डोळे खराब होतात, चष्मा लागतो यात काहीच तथ्य नाही. मात्र, डोळ्यांना थकवा किंवा ताण येऊ शकतो.

२) जेवल्यानंतर स्विमिंग करू नये
– जेवल्यानंतर स्विमिंग करू नये यात तथ्य नाही. मात्र, उपाशी पोटी पाण्यात उतरल्याने पायांना वात भरू शकतो. त्यामुळे पाण्यात उतरण्याआधी थोडेसे हलके पदार्थ खावेत.


३) शेव्हिंग केल्याने दाढी वाढत राहते
– सतत शेव्हिंग केल्याने दाढीच्या केसांची वाढ होत राहते आणि दाढीचा रंगही डार्क होत राहतो, असे सांगितले जाते. परंतु, सतत शेव्हिंग केल्याने असे काहीही होत नाही.

४) सतत बाहेरचे खाल्याने अल्सरचा धोका
– फास्ट फूड खाल्याने अल्सर होत नाही. जेवणातून हेलिबॅक्टर पिलोरी हे विषाणू सेवन केल्यास अल्सर होतो. मात्र, हे विषाणु रस्त्यावर असलेल्या अन्नावर असू शकतात.

५) थंड पाणी प्यायल्याने सर्दी होते
– सर्दी किंवा इतर आजार हे वातावरणात असलेल्या किटाणूंमुळेच होतात.

६) दिवसभरात ८ ग्लास पाणी प्या
– पाणी इतर अन्नपदार्थांच्यावाटे शरीराला मिळाले तरी चालते. मात्र काहीजण द्रवयुक्त पदार्थ खाण्याव्यतिरिक्तही ८ ग्लास पाणी पितात, जे चुकीचे आहे.

७) च्युईंगम पोटात सात वर्ष राहते
– हा अगदी चुकीची समज आहे. इतर अन्नपदार्थांप्रमाणे च्युईंगम चुकून गिळल्यानंतर ते ही विष्ठेतून बाहेर पडते.


आरोग्याबाबतचे ‘हे’ ७ गैरसमज आज करा दूर, जाणून घ्या सत्य