बातम्या

उन्हाळ्यात तेलकट त्वचा होतेय?; मग ‘हे’ उपाय करा, होईल समस्या दूर

Getting oily skin in summer


By nisha patil - 10/2/2024 7:56:01 AM
Share This News:



 उन्हाळ्याच्या दिवशी वाढत्या तापमानामुळे गरमी लागते. त्यामुळे माणूस त्रस्त होतो. या काळात आरोग्यावर देखील काही परिणाम होत असतो. विशेष म्हणजे त्वचावर (Skin) देखील विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे अनेकजण यावर उपाय करत असतात. उष्णता. घाम यामुळे चेहरा अधिक तेलकट होतो. त्यामुळे चिकटपणाही वाढतो. या सर्व कारणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लिमिशेस  अशा समस्या उद्भवतात.

 

आपल्या चेहऱ्यावर काही समस्या जाणवू लागल्या की आपण लगेच घरगुती उपाय करत असतो. आपला चेहरा तेजोमय, सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. खरंतर अनेकांची मुख्य समस्या म्हणजे चेहरा तेलकट होणे हे असते. त्यामुळे यावर स्किन केअर रूटीनमध्ये दोन गोष्टींचा समावेश केला तर त्यांच्या चेहऱ्यावरील चिकटपणा निघून जाईल. अशा समस्या घालवण्यासाठी काही उपाय आहेत ते जाणून घ्या. (


 

1. एक्सफोलिएशन  –
तेलकट त्वचेवर मृत पेशी आणि घाण जमा होते, त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या सुरू होते. तुम्ही आठवड्यातून एकदा स्क्रब करू शकता. पण लक्षात ठेवा की तेलकट त्वचेसाठी स्क्रब करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्याच वेळी, तुमच्या स्क्रबमध्ये मेन्थॉल आणि युकॅलिप्टस  असणे आवश्यक आहे. ते त्वचेला शांत आणि थंड करण्यास मदत करतात.

 

2. फेस पॅक  –
तेलकट त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फेस पॅकचाही वापर करणे आवश्यक आहे.
आठवड्यातून एकदा  वापरून त्वचेला होणारे नुकसान टाळता येते आणि त्वचेला पोषक बनवता येते.
तुम्ही मुलतानी माती फेस पॅक, कोरफड  आणि हळद फेस पॅक ,
ओटमील  आणि हनी फेस पॅक , बेसन 
आणि दही फेस पॅक  इत्यादी वापरू शकता.


उन्हाळ्यात तेलकट त्वचा होतेय?; मग ‘हे’ उपाय करा, होईल समस्या दूर