बातम्या
घुणकीत वारणा सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे जॅकवेल कोसळले, सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान
By nisha patil - 3/7/2023 1:24:44 PM
Share This News:
तारा न्युज वेब टीम : घुणकी येथील वारणा पाणी पुरवठा संस्थेचे वारणा नदीकाठी असलेले जॅकवेल ढासळल्याने सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती संस्थेचे सभापती संभाजी पाटील, सचिव दिलीप सुर्यवंशी व संचालकांनी दिली.
संस्था चालकांनी दिलेली माहिती अशी
घुणकी येथील वारणा नदीकाठी वारणा सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे जॅकवेल होते. यामध्ये ४० एच.पी. टर्बो वीटी दोन व १५ एच. पी. ची एक पाण्यातील विद्युत मोटर होती. वारणा पाणी पुरवठा संस्थेचे जॅकवेल पायापासूनच कोसळल्याने जॅकवेलमधील मोटारी, पाण्यातील विद्युत मोटर बुडाली. पाईप, नळासह सर्व साहित्य पाण्यात बुडाले. सध्या इथे जॅकवेलच्या बांधकामाचा शेष भाग दिसत नाही. त्यामुळे संस्थेचे ४० ते ५० लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.विनोद शिंगे कुंभोज
घुणकीत वारणा सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे जॅकवेल कोसळले, सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान
|