बातम्या

बिबट्याचा हल्लात मुलगी ठार..

Girl killed in leopard attack


By nisha patil - 11/21/2023 4:45:58 PM
Share This News:



सारिका आपल्या चुलतीसोबत घराशेजारीच शेळी चारण्यासाठी गेली होती चुलती पुढे मध्ये शेळ्या पाठीमागे सारिका असे जात असताना घरापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराजवळ दाट गवताच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारीका वर हल्ला केला. तिच्या मानेवर, डोक्यावर खोलवर जखमा केल्या. चुलतीने आरडाओरडा करत बिबट्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी प्रयत्न केले. बिबट्या निघून गेला परंतु तोवर खूप वेळ झाला होता. त्यातच जागेवर तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. असून सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे व वनविभाग मलकापूर येथे झाली आहे.
     

 वनविभागाच्या बाबतीत ग्रामस्थ कमालीचा रोष व्यक्त करत सारिकाचा मृतदेह हलवुन दिला नाही. बिबटया व अन्य प्राण्यांचा उपद्रवाने लोक हैराण झाले आहेत. वन्यप्राण्यांचा (बिबट्याचा) बंदोबस्त करा मगच मृतदेह हलवा अशी मागणी करून ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना धारेवर धरले. वनविभागाने बंदोबस्त करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतरच मृतदेह हलविण्यात आला.


बिबट्याचा हल्लात मुलगी ठार..