बातम्या

पाणी बिलात 50 टक्के सवलत द्या

Give 50 percent discount on water bill


By nisha patil - 12/12/2023 11:17:05 PM
Share This News:



पाणी बिलात  50 टक्के सवलत द्या 

पाणी बिलात महापालिका पाणीपुरवठा विभागाने पन्नास टक्के सवलत द्यावी

आखरी रस्ता कृती समितीच्या वतीने महानगरपालिका उपायुक्तांना निवेदन 


 30 ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर पर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद होता  यामुळे  लोकांनी खाजगी टँकर पाणी पैसे खर्च करून घेतले. यामुळे येणारे पाणी बिलात महापालिका पाणीपुरवठा विभागाने पन्नास टक्के सवलत द्यावी अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त रविकांत आडसुळ यांना करण्यात आली.

पाणीपुरवठा विभागाकडून ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्याची पाणी बिले काढण्याचे कामकाजला  सुरूवात झाली  आहे.  या काळात एक आक्टोंबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत शिवडी वडसह बालिंग उपसा केंद्रावर अवलंबून असणारा शेवटचा पाणीपुरवठा एक दिवस आड येत होते आणि त्याचवेळी  30 ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर पर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद होता 
   

या काळात नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड हालअपेष्टाना  समोर जावं लागलं. यामध्ये सी व  डी वर्णातील लोकांना अक्षरशा पाण्याचा थेंबही मिळाला नाही. लोकांनी पाण्यासाठी खाजगी टँकर बोलावला होता .आणि त्यात त्यांनी पाणी खर्च पूर्ण केला होता. त्यामुळे महानगरपालिकेचे आवश्यक पाणी नागरिकांना मिळालं नाही. यावेळी खाजगी टँकर मुळे त्यांच्या पाण्याच्या गरजा  पूर्ण केल्या होत्या. यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याच्या बिलात  पन्नास टक्के सवलत द्यावी अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त रविकांत आडसुळ यांना करण्यात आली. यावेळी निलेश  हंकारे, संदिप घाटगे,निलेश हंकारे, रियाज बागवान, नितीन साळी  तानाजी पाटील, संदीप घाटगे, अरुण दळवी,विजय क्षीरसागर, आणि किशोर मान, आधी उपस्थित होते


पाणी बिलात 50 टक्के सवलत द्या