बातम्या

गणपती बाप्पाच्या आवडत्या पदार्थाला द्या 'आरोग्य'चा स्पर्श, बनवा खास ड्रायफ्रूट मोदक !

Give Ganapati Bappas favorite food a touch of health


By nisha patil - 9/23/2023 1:17:05 AM
Share This News:



सुक्या मेव्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहीत्य :

सुक्या मेव्याचे मोदक बनवण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 काजू, 8 ते 10 बदाम, 2 चमचे नारळाचे तुकडे, 1/2 चमचा वेलची पावडर, 1 कप पोहे, 1/2 कप गूळ, 2 चमचे कोमट दूध आणि 2 चमचे घरचं तूप लागेल.

सुक्या मेव्याचे मोदक कसे बनवायचे?

– यासाठी सर्वप्रथम 1 कप पोहे पूर्णपणे स्वच्छ करून त्यात काजू आणि बदाम बारीक चिरून घ्या.

– यानंतर कढई घेऊन त्यात पोहे टाकून गॅसवर गरम करायला ठेवा.

– पोहे मंद गॅसवर कोरडे भाजून घ्या आणि नंतर एका मोठ्या भांड्यात वेगळे काढा.

– यानंतर त्याच पातेल्यात तूप घालून काजू-बदाम भाजून घ्यायचे आहेत.

– हलके भाजून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले पोहे आणि भाजलेले काजू, बदाम, गुळाचे तुकडे, नारळाची शेव आणि वेलची पूड घालून चांगले बारीक करा.

– तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून त्यात थोडं तूप आणि दोन चमचे कोमट दूध घालून मिक्स करा.

– लक्षात ठेवा की हे मिश्रण तुम्हाला मऊ पिठासारखे तयार करायचे आहे.

– हे मिश्रण पिठासारखे पूर्ण मऊ झाल्यावर त्याचे छोटे गोळे घेऊन मोदकाच्या आकारात बांधायला सुरुवात करा.

– तसेच सर्व पिठाचे मोदक तयार करावेत. आता मोदक सेट होण्यासाठी थोडा वेळ सोडा.

– त्यानंतर हे स्वादिष्ट सुक्या मेव्याचे मोदक तुम्ही बाप्पाला अर्पण करा आणि तुम्ही स्वतः ते प्रसाद म्हणून खाऊ शकता.


गणपती बाप्पाच्या आवडत्या पदार्थाला द्या 'आरोग्य'चा स्पर्श, बनवा खास ड्रायफ्रूट मोदक !