बातम्या

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या मुलांना एक संधी द्या ; राजे समरजितसिंह घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली विनंती.... ..

Give a chance to children who have crossed the age limit in police recruitment


By nisha patil - 12/6/2024 6:27:17 PM
Share This News:



पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या मुलांना एक संधी द्या ; 
   
 राजे समरजितसिंह घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली विनंती.... ..


कागल / प्रतिनिधी  पोलीस भरतीसंदर्भात  3 मार्च 2023 वय वाढीच्या जीआर ची वैधता एक वर्षांनी म्हणजेच31 मार्च 2024 पर्यंत वाढवून त्या उमेदवारांना 2024 मध्ये जाहीर केलेल्या पोलिस भरतीमध्ये एक वर्ष वयोमर्यादा वाढवून त्यांना आणखी  एक संधी द्यावी अशी विनंती भाजपाचे नेते, शाहू गृपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  निवेदनाद्वारे केली आहे.

  निवेदनात म्हंटले आहे.3 मार्च 2023 च्या  जी आर अनुषंगाने अद्यापही पोलिस भरती झालेली नसल्याने 
 अनेक मुला-मुलींची  वयोमर्यादा ओलांडलेली आहे .

 

 पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या अनेक मुलांनी समरजितसिंह घाटगे यांची भेट घेऊन शासनाकडे याबाबत कैफियत मांडून आमची वयोमर्यादा वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती.त्यानुषंघाने श्री.घाटगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे त्यांच्या दालनात भेट घेऊन विनंती केली. 

तसेच 2019 पासून बँडपथक व कारागृह पोलीस भरती अद्यापही झालेली नाही. पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांनाही या भरतीत संधी मिळावी अशी ही विनंती श्री.घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
      यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचा शब्द दिला असून यामुळे विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.


पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या मुलांना एक संधी द्या ; राजे समरजितसिंह घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली विनंती.... ..