बातम्या
उर्वरीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ लवकरात लवकर द्या
By nisha patil - 6/21/2024 6:30:51 PM
Share This News:
उर्वरीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ लवकरात लवकर द्या
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे समरजितसिंह घाटगेंची यांची मागणी
मुंबईत भेट घेऊन दिले निवेदन
कोल्हापूर,प्रतिनिधी. पिक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या प्रोत्साहन अनुदान योजनेतील वंचित असलेल्या उर्वरीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ लवकरात लवकर द्या.अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शाह ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई येथे घाटगे यांनी भेट घेऊन हे निवेदन दिले.
निवेदनातील मजकूर असा. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानंतर प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली.मात्र आर्थिक वर्षाच्या निकषासह अन्य कारणांने अद्यापही काही शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. या अनुदान योजनेमध्ये एप्रिल ते मार्च असा आर्थिक वर्षाचा निकष लावल्यामुळे हे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकीत बँकाकडून ऊस पिकासाठी कर्ज पुरवठा केला जातो.या कर्ज हंगामानुसार नोव्हेंबर ते जून या कालावधीत पीक कर्जाचे वाटप केले जाते. या योजनेतील आर्थिक वर्षाच्या निकषामुळे दोन वेगवेगळ्या हंगामात या पिक कर्जाची उचल दिसते.
राज्य शासनाच्या प्रोत्साहन अनुदानसाठीच्या निकषानुसार तांत्रिक अटींमुळे सलग तीन वर्षांपैकी दोन वर्ष नियमितपणे परतफेड केल्याचे दिसत नाही.प्रत्यक्षात या शेतकऱ्यांनी पीक कर्ज दोन आर्थिक वर्षात उचल केले आहे. मात्र त्यांची परतफेड एकाच वर्षात दिसते.त्यामुळे पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करुनही प्रोत्साहन अनुदानापासून हे शेतकरी वंचित आहेत.केवळ कोल्हापूर जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची एकुण संख्या चौदा हजारहून अधिक आहे.अशा सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ देऊन दिलासा द्यावा.अशी आग्रही मागणी निवेदनात केली आहे.
या शेतकऱ्यांनी दोन आर्थिक वर्षांमध्ये हे पीक कर्ज घेऊन त्याची प्रामाणिकपणे परतफेड केली आहे.असा अहवाल विभागीय कार्यालयाकडून शासनाकडे पाठविणेबाबात याआधी विभागीय सहाय्यक निबंधक अरुण काकडे यांच्याशी अशा शेतकऱ्यांसह घेतलेल्या भेटीवेळी चर्चा झाली होती.त्यासाठीचा पुढील पाठपुरावा आपण शासन पातळीवर करू व या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. असा शब्द दिला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले.त्यांनी येत्या अधिवेशनात याबाबत आर्थिक तरतूद करून या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम लवकरात लवकर जमा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे सांगितले.
उर्वरीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ लवकरात लवकर द्या
|