बातम्या

डी वाय पी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांनी दिले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे धडे

Given by the students of DYP Salokhenagar Computer lessons for rural students


By nisha patil - 10/19/2023 3:30:09 PM
Share This News:



डी वाय पी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांनी दिले 
 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे धडे

-आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम

सध्याचे युग हे डिजिटल युग असून कॉम्पुटरचे महत्व सतत वाढत आहे. कॉम्पुटर शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या संकल्पनेतून साळोखेनगर येथील डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे धडे दिले.

   कोल्हापूर दक्षिण चे आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून साळोखेनगर येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने डिजिटल साक्षरता अभियान राबविण्यात आले. यामध्ये महाविद्यालयाच्या डेटा सायन्स विभागातील आकाश साखरे, अदिती पाटील, पृथ्वीराज चव्हाण, गौरी कुलकर्णी, वेदांतिका पाटील प्राची माने, गौरांग लवणे, श्वेता गुरव, सुमित परदेशी, श्रेया कुचेकर, अक्षय पोरे,  सृजन थोरात,अविनाश कत्ते, वैभव कुंभार, समृद्धी बारटक्के, सानिका शिंदे, सलीम मुलाणी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 
   
या विद्यार्थ्यानी दक्षिण विधानसभा मतदार संघातील इस्पूर्ली  येथील दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल,  चुये मधील एस. एच.पी विद्यालय आणि इस्पूर्ली येथील जय हनुमान विद्यालय आदी शाळांमध्ये कॉम्पुटरचे महत्व आणि त्याचा वापर यावर कार्यशाळा घेतल्या. नवनवीन तंत्रज्ञान, कॉम्प्युटरचे विविध पार्ट्स, विविध कोडिंग भाषा, विध्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे ऍप्लिकेशन याबाबतची माहिती देऊन विद्यार्थ्यांना डिजिटली साक्षर करण्यात आले. 

याबाबत बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, सध्याच्या युगात असलेली डिजिटल साक्षरता खूपच महत्वाची आहे. संगणकाचा वापर यापुढे वाढतच जाणार आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच संगणकाचा वापर महत्व याची ओळख होणे गरजेचे आहे. त्यामुळेच डिजिटल साक्षरता अभियान हा उपक्रम  हाती घेतला आहे. यामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन संगणक तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत. विद्यार्थ्यांचा उत्साह कौतुकास्पद आहे. 

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजित माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने आणि डाटा सायन्स विभागप्रमुख डॉ. श्रीकांत भोपळे यांचे मार्गदर्शन लाभले.

इस्पूर्ली : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून संगणकाचे धडे गिरवताना विद्यार्थी.


डी वाय पी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांनी दिले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे धडे