बातम्या

ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे आता ओटीटीवर

Glamorous actress Neha Pendse now on OTT


By nisha patil - 2/27/2024 4:33:07 PM
Share This News:



घायाळ करणारे सौंदर्य आणि  अभिनयामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री नेहा पेंडसे  आता ओटीटीवर पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी धाटणीच्या मालिकेतून नेहाने टीव्ही मालिकेत पुनरागमन केले होते. आता, नेहा पेंडसे लवकरच ओटीटीवर झळकण्याची शक्यता आहे. 

अभिनेत्री नेहा पेंडसे ही ‘भाभी जी घर पर है’ मधल्या तिच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. त्याशिवाय ती ग्लॅमरस लूक आणि फॅशन शैलीसाठीदेखील ओळखली जाते.  वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आता ती लवकरच OTT स्पेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा पेंडसे ही आता लवकरच एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे.  मात्र, तिची भूमिका काय असणार, कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.नेहाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. त्याशिवाय, दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह टीव्ही मालिकेतही तिने आपली छाप सोडली आहे. 2011 मध्ये झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेतही तिने काम केले होते.


ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे आता ओटीटीवर