मनोरंजन

ग्लोबल आडगाव चित्रपटाला राज्य शासनाच्या पुरस्काराची चार नामांकने

Global Aadgaon film received four nominations for state government awards


By nisha patil - 1/31/2025 1:32:07 PM
Share This News:



ग्लोबल आडगाव चित्रपटाला राज्य शासनाच्या पुरस्काराची चार नामांकने

सुप्रसिद्ध उद्योजक आणि चित्रपट निर्माते मनोज कदम यांची निर्मिती असलेला 'ग्लोबल आडगाव' चित्रपट राज्य शासनाच्या ६० व्या चित्रपट पुरस्कारांसाठी चार नामांकने मिळाली आहेत.

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट कथा (अनिलकुमार साळवे), उत्कृष्ट गीते (प्रशांत मडपूवार), आणि उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता (रोनक लांडगे) अशी चार नामांकने मिळाली आहेत.

चित्रपटाने ग्लोबलायझेशनच्या प्रभावाने शेती आणि ग्रामसंस्कृतीवर होणाऱ्या दुष्परिणामांवर भाष्य केले आहे. 'ग्लोबल आडगाव' चित्रपटात सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, आणि रोनक लांडगे यासारख्या दिग्गज कलाकारांनी अभिनय केला आहे.


 

हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रासह देशभर प्रदर्शित होईल, अशी माहिती निर्माते मनोज कदम यांनी दिली.


ग्लोबल आडगाव चित्रपटाला राज्य शासनाच्या पुरस्काराची चार नामांकने
Total Views: 71