बातम्या
गोकुळचे चेअरमन अजित पवारांसोबत ?
By nisha patil - 4/7/2023 12:24:52 PM
Share This News:
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पाडली आहे. यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे . शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीचे नेतृत्व आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आमदार हसन मुश्रीफ यांचाही सहभाग आहे. अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जागोजागी शुभेच्छा फलक लावले. मात्र सध्या ही शुभेच्छा फलक सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत. गोकुळ दूध संघाचे विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांनी अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या शुभेच्छा चा फलक कोल्हापुरातील मुख्य चौकात उभारलेला आहे मात्र या फलकावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गायब झाल्याचं दिसून येतंय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्तांतर घडवून सत्ता स्थापन केली. मात्र चेअरमन अरुण डोंगळे यांच्या या शुभेच्छा फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री हसन मुश्रीफ अरुण डोंगरे आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक डोंगरे यांचेच छायाचित्र झळकत आहेत. हा फलक लावून अरुण डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबतच असल्याचा पुरावा दिला असल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सुरू आहे.
गोकुळचे चेअरमन अजित पवारांसोबत ?
|