बातम्या

गोकुळची हातकणंगले तालुका संपर्क सभा उत्साहात संपन्न....

Gokuls Hatkanangle taluka contact meeting concluded with enthusiasm


By nisha patil - 6/8/2024 7:08:08 PM
Share This News:



 कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर ( गोकुळ ) हातकणंगले तालुका संपर्क सभा २०२४-२५ अतिग्रे येथील आशीर्वाद मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात संपन्न संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ माजी चेअरमन विश्वासरावजी पाटील (आबा) यांच्या हस्ते तर मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर व सर्व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आला. 
यावेळी बोलताना मा.चेअरमन विश्वासराव पाटील म्हणाले आपल्या भागातून म्हैस दुधापेक्षा गायीचे दूध वाढले आहे. तर गाय दुधावर नियंत्रण आणून म्हैस दूध कसे वाढेल याकडे दूध उत्पादकांनी लक्ष द्यावे. आपल्याला गाय दुधापेक्षा म्हैस दुधाला मागणी जास्त आहे. यासाठी म्हैस दूध वाढीकडे आपण लक्ष द्यावे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मा चेअरमन तसेच सर्व संचालक, दूध उत्पादकाचे स्वागत डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले.

दरम्यान गोकुळ मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा विषयी माहिती दिली. दूध उत्पादक यांना येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यावर मार्ग काढण्यासाठी हा मेळावा आयोजीत केला असल्याचे सांगितले. तसेच विम्याच्या माध्यमातून म्हैस व गाय मृत्यू झाले होते त्यां दूध उत्पादक यांना अनुदानाचा चेक प्रदान केला.

यावेळी संचालक अजित नरके, अभिजित तायशेटे, अमर पाटील, प्रकाश पाटील, एस आर पाटील, शशिकांत चुयेकर, बाबासाहेब चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, किसन चौगुले, बाळासाहेब खाडे चेतन नरके, बयाजी शेळके राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, योगेश गोडबोले तसेच अधिकारी व, दूध संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सेक्रेटरी, सदस्य, इतर उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.


गोकुळची हातकणंगले तालुका संपर्क सभा उत्साहात संपन्न....