बातम्या

गोकुळचे नवीन जातिवंत म्हैशी विक्री केंद्र दूध उत्पादकांना उपलब्ध होणार जातिवंत म्हैशी

Gokuls new Jativant buffalo sales center will provide Jativant buffaloes to milk producers


By nisha patil - 9/10/2024 8:37:14 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ली ता.करवीर येथे जातिवंत म्हैशी (मुऱ्हा,मेहसाणा, जाफराबादी म्हैशी विक्री केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन शुक्रवार दि.११/१०/२०२४ इ.रोजी   सकाळी ११:०० वाजता केर्ली ता. करवीर येथे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या शुभहस्ते व गोकुळचे सर्व संचालक, संचालिका, एन.डी.डी.बी.चे प्रतिनिधी, प्राथमिक दूध संस्‍थांचे प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी व कर्मचारी यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होत आहे अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.    

          या नवीन जातिवंत म्हैशी विक्री केंद्रामध्ये मुऱ्हा, मेहसाणा व जाफराबादी जातीच्या जातिवंत म्हैशी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. जातिवंत व जास्तीत जास्त दूध उत्पादन क्षमता असणारी म्हैस खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना परराज्यात (हरियाना, गुजरात आणि दिल्ली) या ठिकाणी जावे लागत होते. प्रवासासाठी लागणारा वेळ, होणारा अनुषंगिक खर्च, तेथील म्हैशीच्या दुधाची उत्पादन क्षमतीचे खात्री, म्हैस खरेदी रक्कम त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे गोकुळ व एन.डी.डी.बी. नवी दिल्ली यांनी संयुक्तपणे हे विक्री केंद्र सुरु केले आहे.

          या जातिवंत म्हैशी विक्री केंद्रावरती दूध उत्पादकांनी म्हैशी खरेदी केली असता वरील सर्व विषया बाबतची संभ्रमावस्था दूर होणास मदत होणार असून या विक्री केंद्रावरील जनावरे हि जातिवंत, निरोगी, जंतनिर्मुलन, लाळ खुरकत, थायलेरीया लसीकरण व म्हैशींचे ब्रुसेला तपासणी या सर्व बाबींचा दाखला तसेच जास्त दूध देण्याची क्षमता असलेली व म्हैशीच्या आईची अनुवंशिकतेच्या खात्री बाबतची सविस्तर माहिती दूध उत्पादकांना समजण्यास मदत होणार आहे असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.     
 


गोकुळचे नवीन जातिवंत म्हैशी विक्री केंद्र दूध उत्पादकांना उपलब्ध होणार जातिवंत म्हैशी