बातम्या
मनपाच्या फायरमन संभाजी ढेपले यांना सुवर्णपदक
By nisha patil - 10/2/2024 1:41:17 PM
Share This News:
मनपाच्या फायरमन संभाजी ढेपले यांना सुवर्णपदक
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर :अहमदाबादमध्ये झालेल्या ऑल इंडिया फायर सर्व्हिस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड अॅण्ड फायर सर्व्हिस मीट २०२४ स्पर्धेत कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलातील संभाजी शंकर ढेपले यांनी गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. अग्निशमन कर्मचारी स्पर्धेत देशभरातील दलातील अधिकारी, सहभागी झाले होते. गोळाफेकमध्ये ३५८ कर्मचाऱ्यांमाधून ढेपले यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. या जवानांना प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली फायर गेम्ससाठी पाठवले होते. त्यांना मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आदींचे सहकार्य लाभले.
मनपाच्या फायरमन संभाजी ढेपले यांना सुवर्णपदक
|