बातम्या
लोकसभा निकालानंतर सोन्या चांदीच्या दरात वाढ
By nisha patil - 6/6/2024 10:00:41 PM
Share This News:
लोकसभेच्या निकालानंतर लगेच सोन्या चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठा कात्री लागत आहे. सोन्यापेक्षा चांदीच्या दरात मोठी वाढ झालीय. चांदीच्या दरात तब्बल 1400 रुपयांनी वाढ झालीय. तर सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झालीय.
आज चांदीच्या दरात 1400 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या चांदीचे दर हे प्रति किलो 91,800 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरातील ही वाढ मोठी समजली जातेय. बुधवारी वायदे बाजारात चांदीचा भाव हा 90,444 रुपये प्रति किलो होता. चांदीबरोबरच सोन्याच्या दरातही वाढ झालीय. कालच्या तुलनेत सोने आज 400 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. सध्या सोने 73 हजार रुपयांवर पोहोचले आहे. बुधुवारी सोन्याचा दर हा 72,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता.
लोकसभा निकालानंतर सोन्या चांदीच्या दरात वाढ
|