बातम्या

सुवर्णपदक विजेत्या दीक्षा शिरगावकर हिचा माजी आमदार सुजित मिंणचेकर यांच्या हस्ते सत्कार

Gold medal winner Diksha Shirgaonkar felicitated by former MLA Sujit Minnchekar


By nisha patil - 11/7/2023 4:47:55 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : विनोद शिंगे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे जागतिक स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून जलतरणसाठी दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर यांची भाची व वारणा चैतन्य स्पेशल चाईल्ड स्कुलची विद्यार्थिनी कु.दिक्षा जितेंद्र शिरगांवकर रा .वारणा कोडोली हिची निवड झाली होती, त्यामध्ये तीने २५ मीटर स्विमिंग स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले व भारताबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे नाव केले त्याबद्दल मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) व सौ. लेखा मिणचेकर वहिनी यांनी आपल्या भाचीने कौतुकास्पद केलेल्या कामगिरीबद्दक सन्मानपूर्वक सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संतोष संकपाळ सर, अभजित कुंभार, सौ.मनिषा संकपाळ मॅडम,राजेंद्र जाधव, जयंत घाडगे, मुलगीचे वडील जितेंद्र शिरगांवकर,आई सौ.प्रज्ञा शिरगांवकर, तसेच देवानंद शिरगांवकर, सौ.शकुंतला शिरगांवकर  व इतर उपस्थीत होते.


सुवर्णपदक विजेत्या दीक्षा शिरगावकर हिचा माजी आमदार सुजित मिंणचेकर यांच्या हस्ते सत्कार