बातम्या
सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करणाऱ्यांना दिलासा
By nisha patil - 5/14/2024 8:47:05 PM
Share This News:
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. काल देखील सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होते. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी मिळाली आहे. आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झालीय. सोन्याचा भाव हा 73 हजार रुपयांच्या खाली आला आहे. याउलट परदेशी बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे.
सोन्याच्या दरात तब्बल 400 रुपयांची घसरण झालीय. त्यामुळे सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या खाली आलाय. एका बाजूला परदेशी बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर हा 400 रुपयांनी तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 410 रुपयांनी कमी झाला आहे. चेन्नई, पुणे, मुंबई, केरळ आणि अहमदाबादमध्येही दरात घसरण झालीय. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली आहे. त्यानंतर सोने हे 66,900 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं सोनं खरेदीची मोठी संधी आहे.
सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करणाऱ्यांना दिलासा
|