बातम्या

दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ

Gold prices rise after Diwali


By nisha patil - 11/18/2023 6:30:32 PM
Share This News:



 दिवाळीनंतर सोन्याच्या दारात प्रति तोळा १८००रुपयाची वाढ झाल्याने  सोन्याची दर हे उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचे पाहायला मिळत आहे जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदरात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वळवला असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होऊन ही दरवाढ झाली  आहे

दिवाळी काळात सोन्याचे दर हे जीएसटी सह. ६१५०० रुपये इतके होते दिवाळीत सोन्याला मोठी मागणी असल्याने राज्यभरात 500 कोटी रुपयांची सोने विकले गेल्याचे सांगितले जात आहे दिवाळीनंतर नेहमी सोन्याची मागणी कमी होत असते त्यामुळे दर देखील कमी होत असतात यंदा मात्र याच्या अगदी विरुद्ध चित्र सुवर्णनगरीमध्ये पाहायला मिळत आहे दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण होण्याऐवजी सोन्याच्या दरात प्रति तोळा 1800 रुपये ची वाढ झाली असून सोन्याचे दर पुन्हा एकदा जीएसटी सह 63 हजार 300 रुपये इतक्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत दिवाळीपासून सोन्या चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे आज एक किलो चांदीचा दर 76 हजार रुपये आहे


दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ